Nirgudsar Crime : घरफोडीच्या उद्देशाने घुसलेल्या अज्ञात चोरट्यांकडून वृद्धाचा खून

थोरांदळे गावातील पाईनमळा परिसरात घरफोडीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी दामोदर मिंडे या वृद्धाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आली उघडकीस.
damodar minde

damodar minde

sakal

Updated on

निरगुडसर - थोरांदळे (ता. आंबेगाव) गावातील पाईनमळा परिसरात घरफोडीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी दामोदर जयराम मिंडे (वय-६२) या वृद्धाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत दामोदर मिंडे यांची मुलगी सौ. गितल सतीश गावडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com