
पुणे शहरातील आंबेगाव परिसरात एक अत्यंत खेदजनक आणि समाजाच्या भावनांना ठेच पोहोचवणारी घटना घडली आहे. शिवसृष्टी प्रकल्पाच्या फलकावर एका वयोवृद्ध इसमाने लघुशंका केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संबंधित इसमावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.