स्कुटीच्या धडकेने गंभीर जखमी झाल्याने ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मळद (ता. दौंड) येथील सेवा रस्त्यावरून पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला एका पांढर्‍या रंगाच्या स्कुटीने पाठीमागून धडकेने गंभीर जखमी झाल्याने ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला.

स्कुटीच्या धडकेने गंभीर जखमी झाल्याने ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू

कुरकुंभ - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मळद (ता. दौंड) येथील सेवा रस्त्यावरून पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला एका पांढर्‍या रंगाच्या स्कुटीने पाठीमागून धडकेने गंभीर जखमी झाल्याने ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघात गुरूवारी ( ता. 22 ) उशिरा झाला.

मळद येथील पद्मावती मंदिराजवळून सेवा रस्त्याच्या बाजूने पायी चाललेले अप्पा बाबुराव साळवे (वय 70, रा. मळद, ता. दौंड.) यांना पाठीमागुन येणारी स्कुटी मोटार सायकलने (एमएच.,12, एससी. 0262) धडक दिली. स्कुटीवरील अज्ञात चालकाने त्यांचे ताब्यातील स्कुटी भरधाव वेगात चालवून व नियमांकडे दुर्लक्ष करून अप्पा बाबुराव साळवे यांना पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अप्पा साळवे किरकोळ व गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर अज्ञात स्कुटीचालक पळून गेला. यासंदर्भात प्रकाश सयाजी साळवे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात स्कुटीचालकाविरूध भारतीय दंड संहिता कलम 304 (अ), 279, 337, 338 व मोटर वाहन कायदा कलम 184,134/177 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार कुंभार करीत आहेत.

Web Title: Elderly Person Dies Due To Serious Injuries After Being Hit By Scooty Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punecrimeaccidentdeath