Ajit Pawar with Clock Symbol
sakal
बारामती - बारामती व माळेगावच्या सर्वांगिण विकासासाठी घडयाळाच्या चिन्हावर उभ्या राहणा-या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणूकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. मुलाखती घेतल्यानंतरही नावांची घोषणा गुलदस्त्यातच असल्याने उमेदवारांच्या निवडीबाबतचा सस्पेन्स कायमच राहिलेला आहे. अंतिम यादी नेमकी केव्हा जाहीर होणार याचा खुलासा अद्याप झालेला नाही.