आमदार रोहित पवारांच्या रिक्त जागेसाठी होणार निवडणूक

Election to be held for the vacant seat of MLA Rohit Pawar.jpg
Election to be held for the vacant seat of MLA Rohit Pawar.jpg

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांमधून आमदार झालेल्यांच्या झेडपी सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात पोटनिवडणूक घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे. यामुळे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असताना आमदार झालेल्या रोहित पवार यांचा झेडपीतील वारसदार फेब्रुवारीत ठरणार आहे.      

चोरी करायला गेले चक्क प्राथमिक शाळेत

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ-गुणवडी या गटातून रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. त्यांना उणेपुरे अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला. आमदार झालेल्या सदस्याचे नाव राजपत्रात प्रसिद्ध होताच, त्यांचे झेडपी सदस्यत्व आपोआप संपुष्टात येते. त्यानंतर ही जागा रिक्त होते. या नियमानुसार रोहित पवार यांच्या जिल्हा परिषद गटाची जागा सध्या रिक्त झालेली आहे.

मालकाच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या 

याआधी माजी सहकारमंत्री आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व खेडचे माजी आमदार सुरेश गोरे आदी नेत्यांचे झेडपी सदस्यत्व आमदार झाल्याने संपुष्टात आले होते. गेल्या एका दशकातील झेडपीतून विधानसभेवर जाणारे रोहित पवार हे तिसरे आमदार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com