NDA Pune: पुण्यात खळबळ, एनडीए परिसरात सापडला बॉम्ब

Pune News: सुरुवातीला याची माहिती सर्वत्र पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Bomb found in NDA area of Pune
Bomb found in NDA area of PuneEsakal

पुण्यातील एनडीए परिसरात बॉम्ब सापडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान BDDS पथकाने हा बॉम्ब निकामी केला आहे. असे असले तरी सुरुवातीला याची माहिती सर्वत्र पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Bomb found in NDA area of Pune
Suresh Jain: निवडणूकीच्या तोंडावर सुरेश जैन यांची राजकीय निवृत्ती चर्चेत; आघाडीसाठी धक्का, महायुतीसाठी लाभदायी; निर्णयाचे कारण अनुत्तरितच

उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या परिसरात कमळा देवी मंदिरामागे एका पुलाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना तेथे हॅन्ड ग्रॅनाईट आढळल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक कदम, पोलीस उपनिरीक्षक अनुसे, एटीसी पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

पुढे पोलिसांनी BDDS पथकाला पाचारण केले. सदरची वस्तू धोकादायक असल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 यांच्या परवानगीने हे ग्रेनाईट नष्ट केले आहे. याबाबतची माहिती उत्तम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख यांनी दिली आहे.

Bomb found in NDA area of Pune
Narhari zirwal: झिरवाळांकडून महायुतीचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंच्या व्यासपीठावर हजेरी

या बॉम्बची विल्हेवाट लावल्यानंतर बीडीडीएस पथकाने नागरिकांना घाबरून जाऊ नये, असं अवाहन केले.

यावेळी हा बॉम्ब कुठून आला याबाबतची उलट-सुलट चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, जवळच एनडीए असल्याने अनेक वर्षांपूर्वी सराव करताना हा बॉम्ब येथे पडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com