
पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर
पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा महापालिका भवनात जाहीर करण्यात आला. मात्र अद्याप ऑनलाइन जाहीर न केल्यामुळे कार्यकर्ते, उमेदवार यांची गैरसोय झालेली आहे. दुपारी दोन नंतर ऑनलाइन आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरवात झाली आहे. २८ जानेवारी रोजी आयोगाने महापालिकेने तयार केलेला आराखडा मंजूर केल्यानंतर आता तो नागरिकांना हरकती सूचना नोंदविण्यासाठी खुला केला जाणार आहे. त्यामध्ये प्रभागाची चतुःसिमेसह प्रभाग निहाय व एकत्रित असे नकाशेही बघता येणार आहेत.
पुणे महापालिका भवनाच्या विस्तारित इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास प्रारूप प्रभाग रचना पाहण्याची व्यवस्था केली गेली, तसेच क्षेत्रीय कार्यालय निहाय संबंधित प्रभागांचे स्वतंत्र नकाश उपलब्ध केले आहेत. दरम्यान, काल प्रभागांची नावे लिक झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे आज ही प्रभाग रचना जाहीर करण्यापूर्वी प्रशासनाने अतिशय गुप्तता ठेवत की बाहेर जाऊ नये यासाठी काळजी घेतली.
महापालिकेच्या संकेतस्थळावरही नकाशे आणि अधिसूचना जाहीर केली जाणार होती, पण दुपारी एक वाजून गेला तरी प्रशासनाने ही माहिती आॅनलाईन टाकली नाही. अधिसूचना पहायला मिळत नसल्याने प्रभागांची सीमा कळणे अवघड झाले आहे.
महत्त्वाचे टप्पे आणि तारीख
- प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे - १ फेब्रुवारी
- अधिसूचनेवर हरकती व सूचनांसाठी मुदत - १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी
- हरकती व सूचनांचे विवरणपत्र आयोगाला सादर करणे - १६ फेब्रुवारी
- हरकती व सूचनांवर सुनावणीसाठी अंतिम मुदत - २६ फेब्रुवारी
- सुनावणीनंतर शिफारशींसह विवरणपत्र आयोगाला पाठविणे - २ मार्च
Web Title: Election Commission Ward Plan Pune Municipal Corporation Was Announced
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..