मंचर नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर: इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election news Manchar Nagar Panchayat election program announced election process July 20 pune

मंचर नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर: इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू

मंचर : येथील नगरपंचायत निवडणूक चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया बुधवार ( ता. 20 जुलै)पासून सुरू होणार आहे . ता.18 ऑगस्ट रोजी निवडणूक मतदान होईल अशी माहिती मंचर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज स्पष्ट यांनी दिली. मंचर ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यामुळे प्रथमच होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. इच्छुक उमेदवारांची गेल्या पंधरा दिवसापासून लगबग सुरू झाली आहे. शुक्रवार( ता. 22) ते गुरुवार (ता.28 ) पर्यंत सकाळी 11 ते दुपारी तीन वेळेतराज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर नाम निर्देशन पत्र इच्छुक उमेदवारांनी भरायचे आहेत.

शनिवार ( ता. 23 ) रविवार ( ता.24 रोजी) या सुट्टीच्या दिवशी नाम निर्देशन पत्र स्वीकारलेजाणार नाहीत .छाननी व वैध नाम निर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी शुक्रवार ( ता 29) रोजी जाहीर केली जाणार आहे ता.४ ऑगस्ट दुपारी तीन पर्यंतपर्यंत(असेलनसेल) तर नाम निर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर लगेचच उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे जेथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी ता. १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेतमतदान घेतले जाणार आहे . ता१९ऑगस्ट रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्येउमेदवारी अर्ज प्रत्यक्ष द्यावे लागत होते. यावेळी मात्र प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याविषयी निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला आहे.

Web Title: Election News Manchar Nagar Panchayat Election Program Announced Election Process July 20 Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..