पुणे बार असोसिएशनची आज निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

बार असोसिएशनची (पीबीए) वार्षिक निवडणूक गुरुवारी (ता. ३०) होणार आहे.

पुणे - बार असोसिएशनची (पीबीए) वार्षिक निवडणूक गुरुवारी (ता. ३०) होणार आहे. यंदा अध्यक्षपदासाठी ॲड. सतीश मुळीक, ॲड. पांडुरंग थोरवे आणि ॲड. प्रवीण येसादे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. निकाल गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खजिनदारपदी ॲड. भाग्यश्री गुजर यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी ॲड. संजय भालघरे, ॲड. सचिन हिंगणेकर आणि ॲड. योगेश तुपे हे निवडणूक रिंगणात आहेत, तर सचिवपदाच्या दोन जागांसाठी ॲड. विकास बाबर, ॲड. घनश्‍याम दराडे, ॲड. नीलेश निढाळकर आणि ॲड. पीयूष राठी यांच्यात लढत होणार आहे. हिशेब तपासणीस पदासाठी ॲड. ओंकार चव्हाण आणि ॲड. गणेश म्हस्के यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. गिरीश शेडगे हे काम पाहत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of Pune Bar Association today

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: