मार्केट यार्ड - मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगीचा सण साजरा केला जातो. भोगीनिमित्त गृहिणींकडून मिश्र भाजी तयार केली जाते. मात्र, यंदा निवडणुकांमुळे महिला त्यामध्ये व्यस्त असल्याने भाज्यांना अपेक्षित मागणी दिसून येत नाही..यंदा भोगीला भाज्यांचा भाव मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. किरकोळ बाजारात पावशेर भाजीचे भाव २० ते ४० रुपयांपर्यंत आहेत. मटार आणि गाजर या दोन भाज्यांची आवक परराज्यातून होत आहे. सोमवारी मार्केट यार्डात खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी झाली होती.पापडी, वालवर, पावटा, गाजर, बोरे या भाज्यांची किरकोळ बाजारासह कारंजा, हरभरा, वाटाणा, पापडी, वालवर, पावटा, बोरे, वांगी, मटार, शेंगदाणे, कांद्याची पात, गाजर, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीची कणसे, मेथी यासह भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांना मागणी वाढली आहे..मार्केट यार्डातील घाऊक बाजारात भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली होती. तसेच भाज्यांनाही मागणी वाढली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले..बोरांची आठ हजार गोणी आवकभोगीच्या आधी एक ते दोन दिवस महिला भाज्यांची खरेदी करतात. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बोरांचा भाव स्थिर आहेत. सोलापूर भागातून बाजारात बोरांची आवक होत आहे. बाजारात सोमवारी गावरान बोरांची आवक सात ते आठ हजार गोणी इतकी झाली होती.यंदा निवडणूक असल्याने महिला त्यामध्ये व्यग्र असल्याने भाज्यांना म्हणावी तशी मागणी नाही. भोगीनिमित्त गृहिणी मिश्र भाजी तयार करतात. यंदा भोगीसाठीच्या भाज्यांचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. किरकोळ बाजारात पावशेर भाजीचे दर २० ते ४० रुपयांपर्यंत आहेत. आजमितीला अनेक महिला नोकरी करतात. कामाच्या व्यापात भोगीच्या भाज्या निवडण्यास वेळ मिळत नाहीत. त्यामुळे नोकरदार महिलांकडून निवडलेल्या भाज्यांच्या पाकिटांना मागणी काही प्रमाणात असते.- प्रकाश ढमढेरे, भाजीपाला व्यापारी.वाण साहित्याला मोठी मागणीमकर संक्रांतीनिमित्त महिलांकडून हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांत सहभागी महिलांना वाण देण्याची प्रथा असल्याने वाण साहित्याला मोठी मागणी वाढली आहे. परिणामी, मार्केट यार्ड व परिसरातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. वाण साहित्यात गव्हाच्या ओंब्या, ऊस, हरभरा गड्डी, ज्वारीचे कणीस, बोरे, तिळाची वडी यांचा समावेश असतो.सध्या ऊस, ओंब्या, हरभरा गड्डी आणि ज्वारीच्या कणसाचे भाव १५ ते २५ रुपये दरम्यान आहेत. बोरांचा भाव १०० ते १२० रुपये प्रतिकिलो असून तिळाच्या वड्यांचे भाव दर्जानुसार २० ते १०० रुपयांपर्यंत आहेत. विशेष म्हणजे, यंदा वाण साहित्याचे भाव मागील वर्षाच्या तुलनेत स्थिर आहेत..किरकोळ बाजारात बोरांचे दर८० ते १०० रुपये किलो - गावरान बोरे१२० ते १५० रुपये किलो - चेकनट बोरे१२० ते १५० रुपये किलो - ॲपल बोरे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.