पुणे : चला, सिंहगडावर इलेक्ट्रिक बसने

एक मे पासून ये-जा करण्यासाठी प्रती व्यक्ती १०० रुपये
डोणजे नविन वाहनतळ
डोणजे नविन वाहनतळSakal

खडकवासला - सिंहगडावरील घाट रस्त्यातील होणारी गर्दी टाळण्यासाठी वनविभाग व पीएमपीएल यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस सेवा येता महाराष्ट्र दिनापासून सुरू होत आहे. यासाठीचे दर देखील वन विभागाने जारी केले आहेत. त्यानुसार ई- बसने एका व्यक्तीला गडावर ये- जा करण्यासाठी १०० रुपये प्रवास भाडे आकारले जाणार आहे. वाहतूक सेवा सुरळीत व सुरक्षित असावी. म्हणून वन विभागाने वन संरक्षण समिती, डोणजे - घेरा सिंहगड यांच्या माध्यमातून इ- बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही बस सेवा पीएमपीएमएल'च्या माध्यमातून सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार वनविभाग पीएमपीएमएल यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. बस सुरू झाल्यावर खासगी प्रवासी वाहतूक बंद केली जाणार आहे.

वर्षभर सिंहगडावर पर्यटकांचा राबता असतो. सुट्टीच्या दिवशी पावसाळ्यात पर्यटकांची संख्या जास्त असते. सुट्टीच्या दिवशी दुपारी बारा एक वाजता वाहनतळ पूर्ण क्षमतेने भरते. वाहने उभी करण्यास जागा नसते. त्यानंतर, सिंहगड घाटात शेवटच्या तीन किलोमीटर अंतर वाहतूक कोंडी होते. पर्यटक घाटात वाहने रस्त्यावर उभी करून पायी चालत जात असत. मग कोंढणपूर फाटा येथे गडावर जाणारी वाहन थांबवून गडावर रिकामी जागा झाल्यावर एक दीड तासाने वाहने गडावर सोडली जातात. असा प्रत्येक शनिवार रविवारी, सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडी होते. त्यानुसार, गडावरील प्रवासाचे दरपत्रक ठरविण्यात आले आहे. लहान मुले, नागरिक यांच्यासाठी ये- जा करण्यासाठी वेगवेगळे दर आहेत. सिंहगडावर जाण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची वाहने उभी करण्यासाठी डोणजे याठिकाणी वाहन तळ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनासाठी त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी डोणजे येथील श्रीअमृतेश्वर देवस्थान ट्रस्टची जागा असून त्यांच्याशी देखील वनविभागाचा करार झाला आहे.

वर्षभरापूर्वी गडावर जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्याचा निर्धार वन विभागाने जाहीर केला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पालकमंत्री अजित पवार यांनी वनविभागाच्या विविध उपक्रमाची सिंहगडावर सुरुवात केली होती. त्यादिवशी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्यासाठी इ- बस सेवा सुरू करण्यास सांगितले होते. त्या दिवशी गडावरून परत येताना त्यांनी पीएमपीएल बस मधून प्रवास केला होता. त्यादिवशी इबसची चाचणी घेण्यात आली.

गडावरील वाहनतळावर बसेस चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पॉईंट देखील तयार करण्यात आलेला आहे. पीएमपीएमएल शी दर, बस फेऱ्याबाबत करार झाला आहे. येत्या महाराष्ट्र दिनापासून ही बस सेवा सुरू करण्याचा मानस आहे. याबाबत, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या उपस्थित होणार आहे. सुरवातीला तीन- चार महिने ट्रायल घेतली जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग.

सिंहगडावर जाण्यासाठी ई-बसेस (Electric Bus) नवीन वाहनतळापासून

बसेस वेळापत्रक (सोमवार ते रविवार)

वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत (गरजेनुसार)

नविन वाहनतळ व सिंहगड सिंहगडावर जाण्या-येण्यासाठी बस

इ बसेसचे तिकीट शुल्क / दर :

३ ते १२ मुलांसाठी प्रतीव्यक्ती

जाणे करिता २५ रुपये

येणे करिता २५ रुपये

१२ वर्षापुढील प्रतीव्यक्ती

५०/- जाण्यासाठी

५०/- येण्यासाठी

डोणजे नविन वाहनतळ पार्किंग दर

चारचाकी पार्किंग : २० रुपये

दुचाकी पाकींग वर : १० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com