पुर्व हवेलीत विद्युत रोहित्र चोरट्यांचा धुडगुस पुन्हा सुरु

Crime
Crime

लोणी काळभोर - शेताजवळुन दोन कालवे दुथडी भरुन वाहत असतानाही, पाण्याअभावी पिके जळुन चालल्याचे चित्र दिसले तर तुम्ही काय म्हणाल, खोटे आहे पण दुर्देवाने हे खरे आहे. हा प्रकार मागिल दोन महिण्यापासुन बारमाही बागायती क्षेत्र म्हणवल्या जाणाऱ्या पुर्व हवेलीत वारंवार दिसुन येत आहे. याला कारण आहे शेतीला पाणी पुववठा करणार्या विज पंपाना विजपुरवठा न होणे.. पण विजपुरवठा न होण्याला विजमंडळ नाही तर विद्युत रोहित्रामधील कॉपरच्या तारा चोरणारे चोरटे.

लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीतील सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, तरडे व परिसरात मागिल दोन महिण्याच्या कालावधीत पुन्हा एकदा विद्युत रोहित्र चोरट्यांनी धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आहे. मागिल दोन महिण्याच्या काळात चोरट्यांनी तबब्ल अकरा विद्युत रोहीत्रे फोडुन, रोहित्रामधील कॉपरच्या तारा चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऐन उन्हाळ्यात शेताजवळुन नवीण उजवा मुळा-मुठा कालवा व जुना मुठा कालवा हे दोन्ही कालवे दुथडी भरुन वाहत असतांनाही, विद्युत पंपासाठी विज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांची उभी पिके पाण्या अभावी पिके जळुन चालल्याचे चित्र मागिल कांही दिवसापासुन पुर्व हवेलीत दिसुन येत आहे. चोरट्यांनी लोकवस्तीपासुन दुर असणाऱ्या विद्युत रोहित्राना टारगेट केले असुन, यामुळे महावितरण कंपनीचे कर्मचारी हतबल झाल्याचे दिसुन येत आहे. तर दुसरीकडे डोळ्यासमोर कालव्यातुन मुबलक प्रमानात पाणी वाहत असल्याचे दिसत असतांनाही, चोरट्यांच्या करामतीमुळे पाण्याअभावी पिके जळुन चालल्याने शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहत आहे. 

विज वितरण कंपणीच्या ऊरुळी कांचन विभागीय कार्यालयाच्या हद्दीत मागिल दोन महिण्याच्या काळात तब्बल अकरा रोहित्रे फोडुन, चोरट्यांनी रोहीत्रामधील कॉपरच्या तारा चोरून नेल्या आहेत. यामुळे विज कंपनीची चुक नसतानाही, शेतकरी विजेपासुन वंचीत रहत आहे. मागिल कांही दिवसापासुन उन्ह वाढल्याने, पिकांच्यासाठी पाण्याची गरजही वाढली आहे. उन्हापासुन पिक वाचवण्यासाठी शेतकरी नितांत प्रयत्न करत आहेत. मात्र विध्युत मोटारींच्यासाठी विज पुरवठा होत नसल्याने, शेतकरीही हतबल झाल्याचे चित्र दिसुन येत आहे. 

याबाबत अधिक माहिती देतांना विज वितरण कंपनीच्या उरुळी कांचन उपविभागाचे वरीष्ठ अधिकारी प्रदीप सुरवसे म्हणाले, मागिल दोन महिण्याच्या काळात अकरा रोहित्रांमधील तांब्याच्या तारांची चोरी झाली आहे. तारांच्या चोरीमुळे महावितरणाचे  सुमारे सात लाखापेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे. तर विज पुरवठा खंडित झाल्यामुळे पूर्व हवेलीतील हजारो शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. पोलिसात वारंवार तक्रारी करुनही, याबाबत फारसा फरक पडल्याचे दिसुन येत नाही. चोरटे लोकवस्तीपासुन दुर व एकांगी असणाऱ्या रोहित्रांचा रात्रीच्या वेळी विजपुरवठा खंडीत करुन, त्यावर डल्ला मारत असल्याचे लक्षात आले आहे. चोऱ्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडेसे सावधानता बाळगण्याची गरज आहे. 

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पूर्व हवेलीतील बळीराजा हा खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. चोरट्यांनी तांब्याच्या तर चोरून नेल्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे. या समस्येचा  शेतकऱ्यांना  नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी महावितरणाने खंडित झालेला वीजपुरवठा लवकर सुरु करण्यात यावा.  
- भिमराव शितोळे, शेतकरी, शिंदवणे (ता. हवेली)

अकराहुन अधिक रोहीत्रांमधील कॉपरच्या तारांची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या विज पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रोहित्र चोरीची माहिती मिळताच, लवकरात लवकर रोहित्र बसवून लवकरच वीजपुरवठा पूर्वरत करम्याचा प्रयत्न विज मंडळाकडुन केला जात आहे. चोरीचे प्रमाण  रोखण्यासाठी लवकरच उपाययोजना राबवणार आहेत.
- प्रदीप सुरवसे, उपकार्यकारी अभियंता, ऊरुळी कांचन

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com