

पुणे, ता. ९ : ‘‘विजेची कामे करताना कर्मचाऱ्यांना मोठी जोखीम पत्करावी लागते. यासाठी महावितरण प्रशासनाने अत्याधुनिक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली असून, प्रत्येक कर्मचाऱ्याने या साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे,’’ असे महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी सांगितले.
पवार यांनी मानव संसाधन विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीदरम्यान पुणे परिमंडलातील वीज कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, सहाय्यक महाव्यवस्थापक सत्यजित राजेशिर्के, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे, समन्वयक डॉ. संतोष पटणी यांच्यासह परिमंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘एखादे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी कितीही दबाव असला तरी सुरक्षेच्या नियमांना कधीही बगल देऊ नका. वीज कोणालाच क्षमा करत नाही, त्यामुळे प्रत्येक कामात सुरक्षा साधनांचा वापर अत्यंत आवश्यक आहे.’’
यावेळी काकडे म्हणाले, ‘‘यापूर्वी स्थानिक पातळीवर सुरक्षा साधने उपलब्ध केली जात होती, ज्यामध्ये एकसारखेपणा नव्हता. मात्र, आता कंपनीचे मुख्य कार्यालय एकाच वेळी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी उत्तम दर्जाची सुरक्षा साधने पुरवत असून, या संपूर्ण प्रक्रियेची नोंद ऑनलाइन प्रणालीत होत आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.