ससूनमधील नवीन इमारतीला ३६ तासांमध्ये वीजजोडणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी ससून रुग्णालयात उभारलेल्या अकरा मजली इमारतीमध्ये महावितरणकडून अवघ्या ३६ तासांत नवीन उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली. या इमारतीत उच्चदाब वीजजोडणी कार्यान्वितही करण्यात आली आहे.

पुणे - कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी ससून रुग्णालयात उभारलेल्या अकरा मजली इमारतीमध्ये महावितरणकडून अवघ्या ३६ तासांत नवीन उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली. या इमारतीत उच्चदाब वीजजोडणी कार्यान्वितही करण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ससून रुग्णालयातील या इमारतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामध्ये रुग्णाच्या उपचारासाठी अद्ययावत यंत्रणा सज्ज आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीसाठी ६०४ किलोवॉट वीजभाराच्या उच्चदाब वीजजोडणीसाठी गेल्या गुरुवारी महावितरणकडे मागणी नोंदविली होती. वैद्यकीय सेवेची तातडीची गरज लक्षात घेऊन मुख्य अभियंता सचिन तालेवार, रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत यांनी वीजजोडणीसाठी त्वरित कार्यवाही सुरू केली.

जागेच्या सर्वेक्षणानुसार ससून रुग्णालयाजवळच असलेल्या उच्चदाब २२ केव्ही वीजवाहिनीवरून ही वीजजोडणी देण्याचे निश्‍चित करण्यात आले. तसेच उच्चदाबाच्या नवीन वीजजोडणीची सर्व ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून त्याच दिवशी रात्री कोटेशन तयार करण्यात आले. उच्चदाब वीजजोडणीसाठी वीजयंत्रणा उभारण्याचे काम नियमाप्रमाणे वीजग्राहकांना करावे लागते. मात्र कोरोनाची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता महावितरणकडून वीजयंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हे काम केवळ ८ तासांत पूर्ण करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity to the new building in Sassoon within 36 hours