esakal | वादळी वाऱ्याच्या तडख्याने सोनवडी सुपेत कोसळले वीजेचे खांब अन् झाडे
sakal

बोलून बातमी शोधा

 electricity poles and trees down due to wind blew in Sonwadi Supe baramati

शनिवारी (ता. 27) रात्री आठच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्याने झाडे व वीजेचे खांब उमळून पडले आहेत. येथील वीजरोहित्राला वीजपुरवठा करणारे मुख्य लाईनच्या  तारा व खांब कोसळले. 

वादळी वाऱ्याच्या तडख्याने सोनवडी सुपेत कोसळले वीजेचे खांब अन् झाडे

sakal_logo
By
विजय मोरे

उंडवडी : सोनवडी सुपे ( ता. बारामती )हद्दीतील वावगे- गोंडगेवस्ती परिसरात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने वीजेचे खांब आणि झाडे उमळून पडल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा 

शनिवारी (ता. 27) रात्री आठच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्याने झाडे व वीजेचे खांब उमळून पडले आहेत. येथील वीजरोहित्राला वीजपुरवठा करणारे मुख्य लाईनच्या  तारा व खांब कोसळले. 

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...

विशेष म्हणजे एक किलोमीटर अंतरावर गावात वादळी - वारे आणि पाऊस झालेला नाही. या परिसरात झालेल्या वादळी वाऱ्याने कडवळ, ऊस व चारा पिके भूईसपाट झाली आहे. वादळी वारे भयानक असल्याने येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेवून घरात बसावे लागले. यावेळी झालेल्या पावसाने या वावगेवस्ती परिसरातील ताली, नाला बांध व पाझर तलाव तुडुंब भरले आहेत. अशी माहिती राजेंद्र मोरे यांनी दिली. 

लग्नाच्या पूजेनंतर डीजे लावून सुरू होता डान्स, पोलिसांनी काढली अशी वरात

याबाबत येथील शेतकरी राजेंद्र वावगे व ज्ञानदेव पवार म्हणाले, " वाऱ्याचा वेग जास्त होता. दूध - धारा झाल्यानंतर स्वयपाक सुरु असतानाच वादळी वारे आले होते. अर्धा तास वारा सुरु होता. आम्ही सर्वजण घरात बसून देवाची प्रार्थना करत होतो. येथील वीजेचे खांब दुरुस्त करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. 

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!