Electricity Saving : वर्षाकाठी साडेचार लाखांची वीजबचत

सौरऊर्जा निर्मिती : वाकड सेंटर सोसायटीकडून पर्यावरणाचे संवर्धन
Msedcl Save on electricity bill due to rooftop solar
Msedcl Save on electricity bill due to rooftop solarsakal

बेलाजी पात्रे : सकाळ वृत्तसेवा

वाकड - येथील वाकड सेंटर सोसायटीने पर्यावरणाचे संवर्धन व जतन करण्याच्यादृष्टीने सकारात्मक पावले टाकली आहेत. सोसायटीने उभारलेल्या ऑन ग्रीड सोलर प्रकल्पातून वीजनिर्मिती होत आहे. या प्रकल्पाद्वारे महिन्याला ४० हजारांची तर वर्षाकाठी तब्बल साडेचार लाखांहून अधिक रकमेची वीज बचत होणार असून, पर्यावरण संवर्धनालाही मोठा हातभार लागला आहे.

या ग्रीड सोलार प्रकल्पाचे तसेच रहिवाशांसाठी उभारलेल्या ई चार्जिंग स्टेशनचे आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते रविवारी (ता. २३) लोकार्पण झाले. या वेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर, प्रदेश सदस्या भारती विनोदे, बाळासाहेब आल्हाट, सोसायटीचे चेअरमन शीर्षानंद पांडा, सचिव बिनय रॉय, सूरज भुजबळ यांच्यासह सोसायटीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Msedcl Save on electricity bill due to rooftop solar
Mumbai News : गारगई आता मुंबईची तहान भागविणार...

शहरातील इतर सोसायट्यांनी वाकड सेंटर सोसायटीचा आदर्श घेत समाज व पर्यावरण हित जपावे, अशा शब्दांत आमदार जगताप यांनी कौतुक केले.या प्रकल्पाची २५.७ किलोवॉट क्षमता आहे. या प्रकल्पाद्वारे १४५० वार्षिक युनिट निर्माण होतील. याचाच अर्थ वर्षाला तब्बल साडे चार लाखांची तर प्रत्येक महिन्याला ३५ ते ४० हजारांची वीज बचत होणार आहे.

सोसायटीने उत्पादित केलेल्या या विजेवर जिना, पार्किंग, गार्डन, स्ट्रीट लाइट, टेरेस, क्लब हाऊस या ठिकाणची सार्वजनिक दिवे तसेच लिफ्ट, पाण्याचे पंप, बोअरवेल इत्यादींना मोफत वीज मिळत आहे. सोसायटीने साकारलेले ईव्ही चार्जिंग स्टेशनही याच विजेवर चालणार असून, दोन, तीन व चार चाकी वाहने चार्ज करता येणार आहेत.

जनजागृतीपर स्पर्धा

सोसायटीतील रहिवाशांत पर्यावरण संवर्धन, संगोपन याबाबत जनजागृती व्हावी, या हेतूने शाश्वतता, पर्यावरण आणि हवामान बदल या विषयावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम- संतोष धोटे, द्वितीय- यज्ञ चौधरी, तृतीय- सोनाली पोलाजवार, चतुर्थ- नायनिका चॅटर्जी, उत्तेजनार्थ- तनय रॉय या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com