आमदारांचा एक फोन जाताच माळीमळा येथे रोहित्र बसविले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) माळीमळा येथील ३२ वर्षापूर्वींचे जुने विद्युत रोहित्र जळाले आणि आमदार ऍड. अशोक पवार यांच्या सुचनेनुसार २४ तासांत नवीन रोहित्र बसविल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) माळीमळा येथील ३२ वर्षापूर्वींचे जुने विद्युत रोहित्र जळाले आणि आमदार ऍड. अशोक पवार यांच्या सुचनेनुसार २४ तासांत नवीन रोहित्र बसविल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथील माळीमळा, जकाते मळा, पाटील मळा आदी वस्तीवरील सुमारे २ हजार लोकसंख्येसाठी येथील रोहित्र उपयोगी आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता रोहित्र जळाले. बाजार समितीचे संचालक ऍड. सुदीप गुंदेचा व सामाजिक कार्यकर्ते सुखदेव भुजबळ यांनी रोहित्र जळाल्याची माहिती आमदार अशोक पवार यांना दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार पवार यांनी फोन करून त्वरित महावितरणच्या अधिकाऱ्यांना जळालेले रोहित्र त्वरित बसवून ग्रामस्थांची अडचण दूर करण्याची सूचना केली. त्यानुसार शाखा अभियंता अमोल खंडागळे, वायरमन सुनील हेलवडे व सहकार्यानी त्वरित कार्यवाही करून गुरुवारी अथक परिश्रम घेऊन रोहित्र बसविले. ३२ वर्षानंतर येथील रोहित्र जळाले आहे. रोहित्र त्वरित बसविल्याने आमदार पवार व महावितरणचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आमदार पवार यांचे वीज कनेक्शन- तालुक्यातील कोणत्याही गावातील विद्युत रोहित्र जळाले की आमदार पवार यांना फोनवरून माहिती दिल्यास तातडीने दखल घेतली जाते व त्वरित विजेचा प्रश्न सुटतो, असा विश्वास तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांचा झाला आहे. शिवाय कोणताही मोबदला न देता हे काम होते. विद्युत समस्या व आमदारांचे फोनचे कनेक्शन हे सूत्र सध्या महावितरणला लागू झाल्याचे नागरिक बोलत आहेत. 

(संपादन : सागर डी. शेलार) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity started by installing DP box at Talegaon Dhamdhere