
पवनानगर : मागील ११ दिवसांपासून वीज नसल्याने नागरिकांची होतेय गैरसोय, पवना धरणाच्या आतील १० गावे अजूनही अंधारात असून, त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे पवनमावळात वीजपुरवठा करणारे २५० पेक्षा जास्त विजेचे पोल पडल्यामुळे पवनमावळ भागाचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. अकरा दिवसांचा कालावधी उलटूनही महावितरणास वीजपुरवठा सुरळीत करण्यास यश न आल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
बुधवार (ता.३) रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मावळात महावितरणाचे मोठ्या संख्येत पोल पडले तर काही पोल वाकले. पवनमावळ भागातील वारू, कोथुर्णे, तिकोणा जवण, शिळींब, चावसर, मोरवे व तुंग परिसरातील पोल मोठ्याप्रमाणावर पडले आहेत तर काही वाकले होते त्यामुळे परिसरातील वीज नव्हती परंतु काही गावाची वीज सुरळीत करण्यात महावितरणला यश आले असून भागातील १० गावे अजुनही अंधारात आहेत. विजेअभावी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. नागरिकांपुढे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ग्रामपंचायतीस गावांना पाणी पुरवठा करण्यास अवघड झाले आहे. त्यामुळे मुली व महिला विहिरीवर, धरणावर, नदीवर तसेच डोंगरातील धबधब्याकडे घरी पाणी वाहून आणण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र दिसून येते आहे. यांना दोन ते तीन किलोमीटरचे अंतर कापून मोठी कसरत करून पाणी आणावे लागत आहे. त्यातच धरणाची पाणी पातळी खोलवर गेल्याने पाण्यासाठी लांबचा पल्ला गाठावा लागत आहे तर काही नागरिक बैलगाडी, टॅक्टरच्या साह्याने पाणी आणत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी बियाणांच्या पेरण्या केल्या आहेत. मात्र, पाऊसाने दडी मारल्याने शेतं कोरडी पडली असून पंपाद्वारे पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसल्याने पेरलेली बियाणे खराब होण्याची शक्यता आहे. गावातील पीठ गिरण्या विजेअभावी बंद असल्याने नागरिकांना पवनानगर किंवा लोणावळा येथे नागरिकांना लांबचे अंतर कापून दळण दळण्यासाठी यावे लागत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने दळण दळण्यासाठी न जाता फक्त भातच शिजवून खात आहेत. नदीतील, विहिरीतील, डॅममधील व डोंगरातील पाणी अशुद्ध असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याबाबत, पवनानगरचे महावितरणचे सहाय्यक अभियंता एम. जे. मोमीन यांना विचारले असता ते म्हणाले की,
पवनमावळ परिसरातील २५० पोल पडले होते. त्यापैकी ७०% पोलची दुरुस्ती करण्यात आली आहे तर आतापर्यंत २६ गावांचा वीज पुरवठा व्यवस्थित करण्यात आला आहे. तर १० गावांचा वीज पुरवठा बंद असून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे वेगाने काम चालु आहे व लवकरात लवकर याही गावांचा वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.