esakal | अकरावी प्रवेशाबाबत आज मार्गदर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Online-Admission

अकरावी प्रवेशाबाबत आज मार्गदर्शन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा
पुणे - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग एक आणि भाग दोन कसा भरावा, आरक्षणाच्या प्रकारानुसार कोणती कागदपत्रे सादर करावी, पडताळणी कशा प्रकारे केली जाणार आहेत, याबाबत विद्यार्थी आणि पालकांना उद्‌बोधन वर्गातून मार्गदर्शन केले जाणार आहेत. केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे बुधवारी (ता. 13) शहराच्या विविध भागांमध्ये हे वर्ग आयोजिले आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे ऑनलाइन प्रवेश सुरू होत आहे. यासाठी माहिती पुस्तिका वितरणाचे काम सुरू आहे. मे महिन्यात प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यास सुरवात झाली आहे. ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी दिली.

उद्‌बोधन वर्गाची सविस्तर माहिती
झोनचे नाव : उद्‌बोधन वर्गाचे ठिकाण : वेळ
- पुणे शहर विभाग आणि पर्वत/धनकवडी/स्वारगेट विभाग : आबासाहेब गरवारे कॉलेज असेंबल हॉल : सकाळी 11 ते दुपारी 1
- कर्वेनगर/कोथरूड विभाग : डॉ. श्‍यामराव कलमाडी ज्युनिअर कॉलेज, गणेशनगर, एरंडवणे : दुपारी 2 ते 4
- सिंहगड विभाग : रावसाहेब पटवर्धन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दांडेकर पूल : दुपारी 1 ते 2
- कॅम्प/येरवडा विभाग : आबेदा इनामदार आझम कॅम्प, असेंबल हॉल : दुपारी 3 ते 4
- हडपसर विभाग : साधना मुलांचे विद्यालय, कर्मवीर सभागृह, हडपसर : सकाळी 11 ते दुपारी 1
- शिवाजीनगर/औंध/पाषाण विभाग : मॉडर्न असेंब्ली हॉल, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर : दुपारी 3 ते 4
- पिंपरी/भोसरी विभाग आणि चिंचवड/ निगडी विभाग : म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डी : सकाळी 11 ते 1

अकरावी प्रवेशाची सविस्तर माहिती www.dydepune.com आणि http://pune.11thadmission.net संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
loading image
go to top