11th Online Admission: अकरावी ऑनलाइन प्रवेश संकेतस्थळ ठप्प; विद्यार्थ्यांचा संताप, पहिल्या फेरीला मुदतवाढ व सुधारित वेळापत्रक जाहीर

ऑनलाइन पोर्टल ठप्प झाल्याने अर्ज प्रक्रिया ठप्प, विद्यार्थ्यांचा संताप; शिक्षण विभागाकडून पहिल्या नियमित फेरीला मुदतवाढ, सुधारित वेळापत्रक जाहीर
Technical Glitch Hits Junior College Online Admission Process

Technical Glitch Hits Junior College Online Admission Process

sakal

Updated on

पुणे : इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान गुरूवारी सकाळपासूनच प्रवेशाचे संकेतस्थळ बंद पडले होते. त्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जवळपास दोन तास हे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. दुपारनंतर संकेतस्थळ पूर्ववत करण्यात आले. त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावीच्या पहिल्या नियमित फेरीला मुदतवाढ दिली आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना आता येत्या शनिवारपर्यंत (ता. २३) अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आणि कट-ऑफ येत्या बुधवारी (ता. २७) जाहीर केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com