पुणे : अपहाराच्या पैशातून बांधला बंगला

आरोपीने नगर येथे त्याच्या मुळ गावी बंगला बांधला आहे.
Crime News
Crime Newsesakal

पुणे : विमानप्रवास, पंचतारांकित हॉटेल्स आदींचे बुकिंग रद्द झाल्यानंतर कंपनीतर्फे रिफंड रक्कम ग्राहकांच्या खात्यावर परत जमा करण्याचे काम करणाऱ्या कर्मचा-‍याने ग्राहकांची खोटे नाव, पत्ते, तसेच बँक खाते तयार करीत कंपनीत सात महिन्यांत ७२ लाख ५५ हजार ६९५ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने या पैशांचा वापर करीत नगर येथे त्याच्या मुळ गावी बंगला बांधला आहे. न्यायालयाने (pune court) आरोपीच्या पोलिस (police) कोठडीत १२ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. (embezzlement money built bunglow pune crime news)

जावेद अश्पाक शेख (वय २९, रा. वडगाव शेरी, मुळ रा. नेवासा, अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी खुदबुद्दीन छोटुलाल पटेल (वय ५०, रा. ससाणेनगर) यांनी विमानतळ पोलिसात फिर्याद दिली आहे. शेख हा ‘अपकर्व बिझनेस सर्विसेस प्रा. लि.’ येथे टिम लिडर म्हणून कामाला होता. कंपनीच्या विमाननगर येथील कार्यालयात १ जानेवारी ते ३१ जुलै दरम्यान हा प्रकार घडला. कंपनीकडे कोणत्याही प्रकारची बुकिंग केलेली नसतानाही शेखने रिफंडच्या नावे त्याच्या जवळच्या लोकांची बनावट बँक खाते तयार केले. त्यावर वेळोवेळी तब्बल ७२ लाख ५५ हजार ६९५ रुपयांचीच जमा केली असल्याचे निदर्शनास आले होते.

Crime News
पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कायम

या प्रकरणाचा तपास करीत विमानतळ पोलिसांनी शेखला अटक केली. त्याने अक्रम अश्पाक शेख, अमोल औटी, वसीम बशिर शेख यांच्यासह पाच बँक खात्यावर पैसे पाठविल्याचे उघडकीस आले आहे. ही सर्व खाती पोलिसांकडून गोठविण्यात आले आहेत. त्यातील एकाने एक लाख ६७ हजार १६१ रुपये पोलिसांकडे जमा केले आहेत. शेख याने त्यांच्या मुळ गावी एक गुंठ्यामध्ये नवीन घराचे बांधकाम सुरू केलेले असून त्यासाठी अपहार केलेले पैसे वापरले असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी जावेदच्या पोलिस कोठडीत चार दिवस वाढ करावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.

Crime News
बेशिस्त पुणेकर : नियम धाब्यावर ठेवून वाहतूक सूरू

इंटेरिअरसाठी १९ लाखांचा खर्च

बंगल्याच्या अंतर्गत सजावटीसाठी जावेद याने नगरच्या एका इंटेरिअर डिझायनगरला काम दिले होते. बंगल्याच्या सजावटीसाठी त्याने १८ लाख ७५ हजार ७७४ रुपये दिले असल्याचेही पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. इंटेरियर डिझायनरच्या बँक खात्यावर असलेले ११ लाख ११ हजार रुपये गोठविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com