पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कायम

खड्डे, रस्ता दुरुस्ती, वाहतुकीत बदलामध्ये आता रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळेही वाहतुकीला ठरतोय मोठा अडथळा
chandani chowk traffick
chandani chowk trafficksakal

कोथरुड : रस्त्यावरील खड्डे, कोथरुडकडे (kothrud) उतरणाऱ्या रोडच्या दुरुस्तीचे व उड्डाणपूलाचे सुरु असलेले काम, मुळशीहून (mulshi) येणारी आणि मुंबईहून (mumbai) येणारी वाहने एकाच वेळी महामार्गावर एकत्रित येणे या कारणामुळे वाहतुक कोंडी होत आहे. त्यामध्ये आता रस्त्याच्याकडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळेही वाहतूक मंदावत असल्याची सद्यस्थिती आहे. परिणामी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (traffic jam pune chandni chowk persists)

कात्रज बाह्यवळण मार्गावर चांदणीचौक येथे बहुमजली उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. त्यासाठी ठिकठिकाणी खोदाईचे काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी रस्ता अरुंद होत आहे. चांदणी चौकात संध्याकाळच्या वेळी व सकाळी नऊ ते अकरा या वेळात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. रस्त्यावर ठेला टाकणारे, पथारीवाले, भाजी विक्रेते यांच बरोरब घराचे रिन्युएशनच्यावेळी जो कचरा तयार होतो हा कचरा उदा. जुन्या गाद्या, तुटलेले सोफासेट, बेसिन इ. छोट्या टेम्पोतून या महामार्गाच्या कडेला टाकून वाहनचालक पसार होतात. रस्त्याच्या कडेला साचलेला हा कचरा डुकरे, भटकी कुत्री आदी जनावरे ओढत ताणत सगळीकडे पसरवतात. प्लास्टिकच्या तेलकट खाद्यपदार्थ्याच्या पिशव्यावरुन दुचाकी घसरुन पडण्याच्या घटना अनेक घडतात.त्यामुळे वाहनचालकाला दुखापत होण्याबरोबरच वाहतुकीचाही काळी काळ खोळंबा होतो. महापालिकेने या भागात कचरा टाकणाऱ्रयां कडक दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.

chandani chowk traffick
मास्कच्या ‘ॲलर्जी’वाल्यांना ४३ कोटींचा दंड

बावधन वरुन चांदणीचौकाकडे येणारी वाहने व कोथरुडकडून बावधनकडे येणारी वाहने ही कॅफे कॉफी डे जवळ समोरासमोर येतात. येथे वाहतूक नियंत्रक नाही. वाहतूक पोलिस असताना येथील वाहतूक बऱ्यापैकी नियंत्रणात असते परंतु, इतर वेळी वाहनचालक अनिर्बंधपणे वाहने पिटतात तेव्हा वाहतुकीचा बोजवारा उडतो. कोणी कोणाचेच ऐकत नसल्याने मारामाऱ्यांचे प्रसंग याठिकाणी होतात.

chandani chowk traffick
'रानडे इन्स्टिट्यूट' बाबत चर्चा करणार

त्यातच एलएमडी चौकातून शिंदे पेट्रोलपंपाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना रस्त्यावर येण्यासाठी दोन्ही बाजूच्या वाहनांचा अडथळा समोर येतो. त्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी असते. बावधन येथे जलवाहिनीचे काम सुरु आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. जेथे वाहिनीचे काम झाले आहे. तेथे खड्डा पडून रस्त्याचा शेप बदलल्याने वाहने पडतात व अपघात होतो. जलवाहिनीचे काम झालेल्या रस्त्याचा भाग पुर्ववत करण्याची गरज आहे. अन्यथा गर्दीच्या वेळी सतत अपघात होऊन जिवीत व वित्तहानी होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com