Helicopter Emergency Landing: मुळशी तालुक्यातील सालतरमध्ये खळबळ! दाट धुक्यात हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लॅंडिंग; मोठी दुर्घटना टळली
Pune News: पुणे-मुंबई मार्गावरील खाजगी हेलिकॉप्टरला दाट धुके व खराब हवामानामुळे मुळशी तालुक्यातील सालतर येथे तातडीचे लॅंडिंग करावे लागले. चालकाच्या कौशल्यामुळे प्रवासी सुखरूप राहिले आणि मोठी दुर्घटना टळली.
माले : पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेले खाजगी हेलिकॉप्टर दाट धुके आणि खराब हवामानामुळे मुळशी तालुक्यातील सालतर (ता.मुळशी) गावाजवळील डांबरी रस्त्यावर शुक्रवारी (ता.१५) दुपारी तातडीने उतरवावे लागले. सुखरूप लॅंडिंग झाल्याने मोठी दुर्घटना टळली.