
कात्रज : ‘‘स्वातंत्र्यानंतर सर्वांत काळा दिवस हा आणीबाणीचा आहे. संविधान हत्या करून लोकशाहीची गळचेपी करण्यात आली, तो हा दिवस आहे. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि पूर्ण बहुमत पूर्ण भ्रष्ट करते. एकहाती सत्ता मिळाल्याने गैरव्यहार वाढत गेले. त्यामुळे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींकडून आणीबाणी लादण्यात आली,’’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुहास हिरेमठ यांनी व्यक्त केले.