esakal | "वीजतोड न करता शेतकऱ्यांना हप्ते बांधुन द्या"
sakal

बोलून बातमी शोधा

वीजतोड न करता शेतकऱ्यांना हप्ते बांधुन द्या : प्राजक्त तनपुरे

"वीजतोड न करता शेतकऱ्यांना हप्ते बांधुन द्या"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिगवण : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण आहे. परंतु महावितरण ही सरकारी कंपनी आहे व सरकारची भुमिका ही शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. महावितरणच्या आधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन न तोडता शेतकऱ्यांना हप्ते बांधुन द्यावेत तसेच पाणी पुरवठयाचे व स्ट्रीट लाईटचे कोणतेही वीज कनेक्शन तोडु नये, अशी सुचना उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.

भादलवाडी (ता.इंदापुर) येथे महावितरणच्या वतीने उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राचे उद्घाटन उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते व खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे उपस्थितीत करण्यात आले.तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,प्रताप पाटील, शुभम निंबाळकर, वैशाली पाटील, अभिजीत तांबिले, हनुमंत बडंगर, सारिका लोंढे, विजय शिंदे, डि.एन. जगताप, सचिन बोगावत,सतीश शिंगाडे, धनाजी थोरात, विजयकुमार गायकवाड, सरपंच शिवाजी कन्हेरकर,माजी सरपंच प्रवीण कन्हेरकर उपस्थित होते.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कोरोनाचे संकट असतानाही खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेमुळे तालुक्याला निधीची कमतरता भासली नाही. निसर्गाचा लहरीपणा व कोरोनामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे आर्थिक तरतुद आहे त्यांनी वीज बील भरावे परंतु ज्याकडे आर्थिक तरतुद नाही अशा शेतकऱ्यांसाठी महावितरण कंपनीने हप्ते बांधुन द्यावेत व वीज तोडु नये.

हेही वाचा: मुलांच्या सार्वत्रिक लसीकरणाची अद्यापही शिफारस नाही - नीती आयोग

कार्यक्रमाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, जिल्हा परिषदेमध्ये केलेल्या कामांमुळेच दत्तात्रय भरणे आमदार झाले. गतवेळी विरोधी आमदार असतानाही तालुक्याला निधीची कमतरता पडु दिली नाही. विकासकामांसाठी निधी कसा आणावा याचे उत्तम उदाहरण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वांसमोऱ ठेवले आहे.राष्ट्रवादीने विकासाचे मॉ़डेल राज्यांसमोर ठेवली आहे. प्रताप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अंकुश नाळे यांनी केले सुत्रसंचालन डॉ. निलेश धापटे व अनिल साळवे यांनी तर आभार प्रदर्शन प्रविण शिंदे केले.

loading image
go to top