पुणे - मॅडम, तुमचे नाव कायमस्वरूपी नोकरीच्या यादीत हवे आहे ना, मग विचार करूच नका, पैसे भरा असे भविष्यकाळातील सोनेरी स्वप्ने दाखवून जणुकाही संमोहित केले होते. आजूबाजूचे सहकारी पैसे भरत होते हे पाहून मी नोकरीत कायम होणार नाही याची सतत मनाला टोचणी लागत होती. मन द्विधावस्थेत होते.