मावळते पोलिस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी पोलिसांबद्दल भावना केल्या व्यक्त, म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

पोलिस वसाहतींच्या दुरावस्थेबाबतचे वृत्त वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर एक व्यावसायिक स्वतःहून पुढे आले. त्यांनी साधी शाल, श्रीफळ न स्वीकारता दोन इमारती बांधून देण्यास सुरवात केली, तर सहा इमारती राज्य सरकार बांधत आहे.

पुणे : शहरातील अपघात, गुन्हेगारीचे प्रमाण कमी करतानाच पोलिस कर्मचाऱ्यांना सशक्त, सक्षम करण्याकडे लक्ष दिले. त्यासाठी भावनिक प्रज्ञावंत प्रशिक्षण वर्गही घेतले. केवळ तेवढ्यावरच न थांबता पोलिसांची घरे, पुण्यात शिक्षण घेणाऱ्या राज्यातील पोलिसांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृहाची व्यवस्था करीत पोलिसांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला, अशी भावना मावळते पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केली. 

पुण्यात सत्ताधाऱ्यांची 'कोंडी'

राज्य सरकारच्या गृह विभागाने डॉ. वेंकटेशम यांची नक्षलवाद विरोधी कारवायांसाठीच्या विशेष अभियान विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, पदभार सोडण्यापूर्वी डॉ. वेंकटेशम यांनी शनिवारी (ता.१९) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त संभाजी कदम यावेळी उपस्थित होते. 

पुणेकरांची काळजी वाढवणारी बातमी; पुढील १२ दिवसांत वाढणार ७९ हजार कोरोना रुग्ण!​

आत्तापर्यंत केलेल्या कामाची माहिती देताना डॉ. वेंकटेशम म्हणाले, "पोलिस वसाहतींच्या दुरावस्थेबाबतचे वृत्त वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर एक व्यावसायिक स्वतःहून पुढे आले. त्यांनी साधी शाल, श्रीफळ न स्वीकारता दोन इमारती बांधून देण्यास सुरवात केली, तर सहा इमारती राज्य सरकार बांधत आहे. पुण्यात राज्यातील पोलिसांची मुले शिक्षण घेतात. त्यांच्या मुला-मुलींसाठी उपलब्ध इमारतीमध्ये वसतिगृह सुरू केले आहे, त्यामध्ये 81 विद्यार्थी आणि 88 विद्यार्थिनी आहेत. केवळ तेवढ्यावरच न थांबता 'कॉप्स एक्‍सलन्स' सारखी योजना राबवून पोलिस कर्मचाऱ्यांना भावनिक प्रज्ञावंत प्रशिक्षण दिले. त्याद्वारे पोलिसांना मानसिकदृष्ट्या सशक्त, सक्षम करण्यावर भर दिला. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील मनोरंजन केंद्रातील सभागृहाचे नुतनीकरण सुरू केले. तसेच पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीचे नुतनीकरण करण्यावर भर दिला.'' 

बारामतीत कोरोना पेशंटचे नातेवाईक हैराण; रेमडीसिवीर इंजेक्शनच मिळेना​

- पुणेकरांच्या तक्रारी निवारणासाठीच्या 'सेवा कार्यप्रणाली'द्वारे दोन लाख लोकांना फोन 
- राईत गुन्हेगारांवर कारवाईसाठीचे देशातील पहिले 'एक्‍स्ट्रॉ' ऍप, 32 जणांवर कारवाई 
- पोलिसांच्या मदतीसाठी खासगी सुरक्षा रक्षकांची 'पी फोर'चा उपक्रम राबविला 
- भरोसा कक्षाच्या ज्येष्ठांसह महिलांच्या समस्यांचे निराकरण केले. 
- कोरोना रोखण्यासाठी विविध प्रयोग, मॉडेल राबविले 
- डिजिटल पासद्वारे पुणेकरांसह स्थलांतरित नागरिकांना दिलासा दिला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emphasis on empowerment of police while preventing accidents and crime says Police commissioner Dr. K. Venkatesham