पुणेकरांची काळजी वाढवणारी बातमी; पुढील १२ दिवसांत वाढणार ७९ हजार कोरोना रुग्ण!

Corona_Patient
Corona_Patient

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. यानुसार येत्या फक्त बारा दिवसांत (३० सप्टेंबरपर्यंत) आणखी तब्बल ७९ हजार नवे रुग्ण वाढणार आहेत. यामुळे एकूण रुग्णांची संख्या ३ लाख २३ हजार ५३९ च्या वर पोहोचणार आहे. हे काही भविष्यकारांनी वर्तविलेले भाकित नाही, तर खुद्द राज्य सरकारनेच काढलेले अनुमान आहे. 

यामुळे पुढच्या बारा दिवसांत पुण्यात अॅक्टिव्ह पेशंट (क्रियाशील रुग्ण) रुग्णांची संख्या ६७ हजार ८९४ वर जाणार आहे. परिणामी, पुण्यात साधे बेड (ऑक्सिजनविरहित), ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेडचा प्रचंड तुटवडा निर्माण होणार आहे. 

या अनुमानानुसार, ३ हजार १४१ साधे बेड, २ हजार ६६ ऑक्सिजन बेड आणि २५० व्हेंटिलेटर बेड कमी पडणार आहेत. केवळ बेडअभावी रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागणार आहे. परिणामी, कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या वाढून ती ६ हजार ६९७ वर पोहोचेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. या शक्येतेनुसार, पुढच्या बारा दिवसांत पुण्यात १ हजार १६१ मृत्यू वाढणार आहेत.

कोरोनाची सद्य:स्थिती :

- एकूण रुग्ण - २ लाख ४४ हजार ५१६.

- कोरोनामुक्त रुग्ण - १ लाख ९६ हजार ५५९.

- अॅक्टिव्ह पेशंट (क्रियाशील रुग्ण) - ४२ हजार ४२६.

- आतापर्यंत एकूण मृत्यू - ५ हजार ५३६.

रुग्णांची ३० सप्टेंबरची संभाव्य स्थिती :

- एकूण रुग्ण संख्या - ३ लाख २३ हजार ५३९.

- कोरोनामुक्त रुग्ण - २ लाख ४८ हजार ९४८.

-  क्रियाशील रुग्ण - ६७ हजार ८९४.

- एकूण मृत्यू - ६ हजार ६९७.

रुग्णांची संभाव्य वाढ :

- १२ दिवसांत वाढणारे रुग्ण - ७९ हजार २३.

- कोरोनामुक्त रुग्ण वाढ - ५२ हजार ३८९.

- क्रियाशील रुग्ण - २५ हजार ४६८.

- मृत्यूमध्ये वाढ - १ हजार १६१.

उपलब्ध बेड सद्य:स्थिती :

- साधे बेड (ऑक्सिजनविरहित) - ३७ हजार ५८५.

- ऑक्सिजन बेड - ६ हजार ८१.

- आयसीयू बेड - २ हजार ३६८.

- व्हेंटिलेटर बेड - १ हजार १०८.

३० सप्टेंबरला आवश्यक बेड 

- साधे बेड - ४० हजार ७२६.

- ऑक्सिजन बेड - ८ हजार १४७.

- आयसीयू बेड - २ हजार ३७.

- व्हेंटिलेटर बेड - १ हजार ३५८.

३० सप्टेंबरला कमी पडणारे बेड 

- साधे बेड - ३ हजार १४१.

- ऑक्सिजन बेड - २ हजार ६६.

- आयसीयू बेड - ३३१ (शिल्लक असतील) 

- व्हेंटिलेटर बेड - २५०.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com