लय भारी! आता मिळणार पुणे जिल्ह्यात मागेल त्याला रोजगार

गजेंद्र बडे
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

पुणे जिल्ह्याचा रोजगार हमीच्या कामांचा आगामी वार्षिक कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केला आहे. तो सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. वार्षिक आराखड्याच्या रकमेत आणि मनुष्य दिनाच्या संख्येतही वाढ झालेली आहे.  
- संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

पुणे - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आगामी आर्थिक वर्षासाठी (२०२०-२१) १०७ कोटी २१ लाख ९० हजार २०८ रुपयांचा पुणे जिल्ह्याचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मंजुरीसाठी तो जिल्हा परिषदेच्या उद्या (ता. ६) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या आराखड्यात दोन कोटी मनुष्य दिनाचे (रोजगारासाठीचा निश्‍चित कालावधी) उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे मागेल त्याला रोजगार हमीतून काम मिळू शकणार आहे. या आराखड्यातील नियोजित कामे ही आगामी आर्थिक वर्षात १ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. 

''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही''

चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) तुलनेत आगामी आर्थिक वर्षाच्या आराखड्यात ११ कोटी सहा लाख ५८ हजार ६२७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. चालू वर्षाचा आराखडा ९६ कोटी १५ लाख ३१ हजार ५८१ रुपयांचा होता. जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने निर्माण केलेल्या ‘मनुष्य दिना’तही (रोजगारासाठीचा निश्‍चित कालावधी) सात पटीने वाढ करण्यात आली आहे. यामुळे रोजगाराचा सुकाळ असणार आहे. परिणामी मागेल त्याला रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. चालू आर्थिक वर्षात मनुष्य दिनाची संख्या २९ लाख ९८ हजार २२० होती. ती आता आगामी वर्षासाठी १ कोटी ८९ लाख २८ हजार ११४ करण्यात आली आहे. आराखडा आणि संभाव्य मनुष्य दिनाच्या आधारे ‘लेबर बजेट’ तयार करण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: employment anyone in Pune district