

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी शेतकरी सक्षम हवा
राहुल नार्वेकर : पुसद येथे वसंतराव नाईक स्मृतीदिन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
पुसद (जि.यवतमाळ), ता. १८ : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम हरितक्रांती आणली आणि अन्नधान्याची सुबत्ता आली. राजकारणाला शेताच्या बांधावर नेणाऱ्या या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्याला स्वावलंबी व समृद्ध बनविण्याचे ध्येय बाळगले होते. त्यामुळे विकसित भारत घडवायचा असेल तर शेतकरी मजबूत झाला पाहिजे, असे विचार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.
वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसदच्या वतीने आयोजित वसंतराव नाईक यांच्या ४७ व्या स्मृतिदिन समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरून नार्वेकर बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्यासह सोहळ्याचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी आमदार नीलय नाईक, आमदार किसनराव वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात महाराष्ट्राच्या पाचही विभागातील नऊ प्रगतशील शेतकरी व दोन कृषी शास्त्रज्ञांचा स्मृती मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन नार्वेकर यांच्या हस्ते ‘वसंतराव नाईक कृषी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते प्रा. दिनकर गुल्हाने यांनी संपादित केलेल्या ‘चतुरस्र’ या स्मरणिकेचे व ‘शाबासकीची थाप’ या प्रशस्तिपत्रकाचे विमोचन झाले. डॉ. गडाख यांनी देशातील अन्नधान्य, दूध उत्पादन, भाजीपाला फळे या क्षेत्रातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
गौरव पुरस्कारांचे मानकरी
संतोष पन्हाळे, सात्रळ, जि. अहिल्यानगर,
अवंतिका सुकळकर, पुणे
यज्ञेश कातबने, धनगाव, जि. छत्रपती संभाजीनगर,
माऊली जाधव, सातेफळ, जि. बीड
संगीता सांगळे, सत्यगाव, जि. नाशिक
शशांक पाटील, तांदलवाडी, जि. जळगाव
सुशांत नाईक, वेतोरे, जि. सिंधुदुर्ग
गोपाल भक्ते, पारडसिंगा, जि. नागपूर
अशोक वानखेडे, सुकळी, जि. यवतमाळ
कृषी संशोधन संस्था-
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
कृषी शास्त्रज्ञ :
डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, नरसोबावाडी, जि. कोल्हापूर
पुसद : वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा कृषी गौरव पुरस्कार गोपाल भक्ते (पारडसिंगा, जि. नागपूर) यांना प्रदान करताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर. सोबत कुलगुरू डॉ. शरद गडाख, स्वागताध्यक्ष राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी आमदार नीलय नाईक, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.