महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी- डॉ माळी

महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी- डॉ माळी
Published on

TSG26B02013
तिसंगी (ता. पंढरपूर) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारंडेवस्ती येथे आयोजित मेळाव्यास उपस्थित महिला.
---
कारंडेवस्ती येथे महिला मेळावा उत्साहात
तिसंगी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत जागतिक महिला दिन व महिला सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारंडेवस्ती - २ येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात महिलांच्या सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक जनजागृतीसह पोस्को कायदा आणि महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती डॉ. सुषमा माळी यांनी दिली. यावेळी डोहाळे जेवण व स्तनदा माता अन्नप्राशन दिवसही साजरा करण्यात आला. तसेच महिलांसाठी लिंबू-चमचा, संगीत खुर्ची व ‘तळ्यात-मळ्यात’ अशा स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या मंगल रणदिवे, केंद्रप्रमुख संजय हेगडे, डॉ. सुषमा ओंकार माळी, अंगणवाडी सेविका मनीषा लेंगरे, गीता दुबे, सिंधू कारंडे, स्वाती कोळेकर, उमा रणदिवे, मनीषा मेटकरी आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्पर्धेतील विजेत्यांना मिलिंद परिचारक व अजित चंदनशिवे यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com