राजगुरुनगरमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यान

राजगुरुनगरमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यान
Published on

राजगुरुनगर, ता. ११ : ‘‘स्त्रीमध्ये देवदत्त शक्ती असून तिचा वापर करून महिलांनी अभ्यासाने आणि प्रयत्नांनी स्वव्यक्तिमत्त्व फुलवावे,’’ असे आवाहन राज्य को-ऑपरेटीव्ह बँक्स असोसिएशनच्या संचालिका योगिनी पोकळे यांनी केले.
महिला दिनानिमित्त राजगुरुनगर सहकारी बँकेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे संचालक दिनेश ओसवाल, संचालक राजेंद्र सांडभोर, संचालिका विजया शिंदे, अरुण थिगळे, सहायक सरव्यवस्थापक दिलीप मलघे, शंकर कोल्हे, प्रभावती गव्हाणे, कल्याणी सुतार आदी उपस्थित होते.
पोकळे म्हणाल्या, ‘‘स्त्रियांनी पारंपरिक आचार विचारांच्या प्रक्रियेतून बाहेर पडले पाहिजे. चौकटीबाहेरचा विचार करून स्वतःचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व फुलविले पाहिजे. आत्मविश्‍वास वाढविला पाहिजे. स्वतःचा दर्जा उंचावत नेऊन कुटुंब, संस्था, समाज आणि देशाची प्रगती केली पाहिजे.’’ बँकेच्या वतीने महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. सूत्रसंचालन चैताली पाटोळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com