पुणे - तिरंगा रॅली - मुख्यमंत्री फडणवीस

पुणे - तिरंगा रॅली - मुख्यमंत्री फडणवीस
Published on

तरुणाई भारताचे बलस्थान ः मुख्यमंत्री फडणवीस
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राजमाता जिजाऊसाहेब आणि बालशिवाजी यांनी सोन्याच्या फाळाने जमीन नांगरून पुणे वसवले. याच भूमीत ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच,’ ही घोषणा करण्यात आली. याच पुण्यातील तरुणाई आज राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाली आहे. ही तरुणाई भारताचे बलस्थान असून, त्यांच्या बळावर उद्याचा विकसित भारत आणि महाराष्ट्र घडवायचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ११) केले.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत शहरातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, आमदार महेश लांडगे, राहुल कुल आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘तिरंगा ध्वज हातात घेतल्यानंतर कर्तव्याची जाणीव ठेवावी लागते. संविधानाने नागरिकांवर कर्तव्याच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्र घडविण्याचे काम आपण करत आहोत. प्रगतीचा आणि तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारा महाराष्ट्र घडवायचा आहे.’’

फोटो ओळी ----
पुणे ः फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com