encroachment crime
पुणे - कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर आज पुणे पोलिस आणि पुणे महापालिकेतर्फे नाना पेठेत आंदेकराचा प्रभाव असलेल्या भागात अतिक्रमण कारवाई केली. टपऱ्या, स्टॉल, अनधिकृत फ्लेक्स काढून टाकले. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. ही कारवाई झालेली असली तरी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे याची माहिती दिलेली नाही.