
पुणे : महापालिकेच्या शाळा, क्रीडांगणे, दवाखाने, नाट्यगृह, प्रकल्पबाधितांसाठीची घरे अशा विविध प्रकारच्या मिळकतींच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांचा अभाव आहे. त्यामुळे संबंधित मिळकतींमधील विविध प्रकारच्या वस्तू चोरीस जाण्यापासून तेथे अनेक गैरप्रकारही सुरू आहेत. प्रकल्पबाधितांसाठी असणाऱ्या सदनिकांमध्ये बेकायदा अतिक्रमणाचे प्रकार सुरू आहेत. तरीही त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.