
Illegal Construction
Sakal
वारजे : पुणे महापालिकेच्या वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने बांधकाम विकास आणि अतिक्रमण निर्मूलन विभागांच्या सहकार्याने अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. समुद्र हॉटेलपासून नळस्टॉप चौक, करिष्मा सोसायटी चौक, जी. ए. कुलकर्णी पथ, तसेच महर्षी कर्वे पुतळा चौक ते वारजे हायवे पूल या परिसरातील रस्ते, पदपथ आणि मार्जिनमधील अनधिकृत आस्थापनांवर कारवाईनंतर या भागातील वाहतुकीला होणारा अडथळा दूर झाला.