Encroachments Removed From 12400 Square Feet Area Between Bhumkar Chowk and Shree Control Chowk
sakal
धायरी - सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नऱ्हे येथील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौक या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या जागेतील अतिक्रमणांवर गुरुवारी (२७) महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली. बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक दोन, अतिक्रमण विभाग आणि आकाशचिन्ह विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल १२ हजार ४०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.