Pune Traffic : वारजे परिसरात सीएनजीचा तुटवडा; रस्त्यावर तासन्तास वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
CNG Shortage : वारजे भागातील सीएनजी पंपांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असून, रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या परिस्थितीमुळे रिक्षाचालक, वाहनचालक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
वारजे : वारजे भागातील सीएनजी पंपांवर मागील काही दिवसांपासून वाहनांच्या रांगा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लागलेल्या दिसत असून, प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. लहान-मोठे अपघातही होत आहे.