
पुणे : तीन वर्षीय मुलाच्या छोट्या आतड्यातून टोकदार चुंबक यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले. यासाठी कमीत कमी छेद देत एंडोस्कोपीक प्रक्रिया करण्यात आली व यामुळे पोटाची शस्त्रक्रिया करण्याची गरज भासली नाही. वानवडीच्या रुबीहॉल क्लिनिकमध्ये हे उपचार झाले.