उर्जामंत्र्यांनी दिला अधिकाऱ्यांना इशारा; अखंडीत वीज पुरवठा करा अन्यथा....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध कामांचा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकताच आढावा घेतला. यावेळी त्यांनी हा इशारा दिला.. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यावेळी उपस्थित होते.
 

पुणे :"सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. त्यात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यास संबंधीत जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल,' असा इशारा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे.
 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध कामांचा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकताच आढावा घेतला. यावेळी त्यांनी हा इशारा दिला.. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यावेळी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राऊत म्हणाले, " कोरोना विषाणूच्या सावटामुळे बंद असलेले व्यवसाय, उद्योग हळूहळू सुरु होत आहेत. यासोबतच शासकीय व खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम देखील सुरु आहे. सध्या उन्हाळा असल्याने अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्याची अत्यंत गरज आहे. ज्या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याची गंभीर दखल घेऊन संबंधीत जबाबदार व अकार्यक्षम कर्मचारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा अशा कारवाईला सामोरे जावे लागेल.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती परिमंडलामध्ये "एक गाव- एक दिवस' हा वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचा, नवीन वीजजोडणी व वीजबिल दुरूस्ती मोहिमेचा उपक्रम सुरु आहे. हा उपक्रम राज्यभरात राबविण्याची घोषणा त्यांनी केली. वीजग्राहकांना वीजपुरवठ्याबाबतची माहिती "एसएमएस'द्वारे मिळालीच पाहिजे. देखभाल व दुरुस्तीसाठी वीज बंद ठेवण्याची पूर्वसूचना असेल किंवा इतर कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची ग्राहकांना पूर्वसूचना न मिळाल्यास गंभीर दखल घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक जिल्हा व तालुक्‍यासाठी असलेली विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या सदस्यांनी निवडप्रक्रिया सुरु होत आहे. या समितीच्या नियमित बैठकी घेण्यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वीजविषयक स्थानिक प्रश्न सोडविण्यात यावे तसेच थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करावेत असे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले. 

पुणे-मुंबईकरांना हवा वाढीव "डेटा'; सेंटरच्या मागणी 40 टक्के वाढणार

उर्जामंत्र्यांनी काय म्हणाले....
-सुरळीत आणि अखंडीत वीज पुरवठा करा 
-वारंवार पुरवठा खंडीत होणाऱ्या भागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करणार 
-"एक गाव एक दिवस' उपक्रम राज्यभर राबविणार 
-विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या सदस्यांची निवडप्रक्रिया लवकर 
-वीज पुरवठा बंदची पूर्वसूचना अथवा खंडीत झाला तर एमएमएसद्वारे ग्राहकांना सूचना द्या. 
-देखभाल-दुरूस्ती न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका 

आता विद्यार्थी म्हणतात, गाव नको, पुणचं बरं! कारण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Energy Minister warns to Provide uninterrupted power supply otherwise take action