
पुणे : राज्य सरकारने अभियांत्रिकी महाविद्यालयातील उपलब्ध असलेल्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या प्रक्रियेत बदल करणारी अधिसूचना काढली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक ते बदल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.