
पुणे : राज्यात अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, वास्तूकला, औषधनिर्माणशास्त्र प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तीनऐवजी चार केंद्रीय प्रवेश फेऱ्या (कॅप) होणार आहेत. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीत बदल केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून नव्या सुधारित नियमावलीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.