
पुणे : अभियांत्रिकी प्रवेशासाठी मंगळवारी (ता. ८) कागदपत्रे दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. मात्र, ‘महाआयटी’च्या सर्व्हरला अडचणी असल्यामुळे दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी केलेले अर्ज प्रलंबित राहिल्याने त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.