esakal | Video : पुणे : इंजिनिअरिंगची पुस्तके मिळणार आता भाड्याने
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्श ठाकुर आणि आयुष जैन.

शाळेतील दोस्ती ते पार्टनरशिप 
मी आणि आयुष मुंबईतील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकताना मित्र झालो. ११वी, १२वीत इंजिनिअरिंगची तयारी करताना पुस्तकांची गरज पडली होती, त्यासाठी मोठा खर्च झाला. पुण्यात अभियांत्रिकीसाठी आल्यानंतर अनेक पुस्तकांची गरज पडत आहे. अभ्यासक्रमाचे सत्र बदलले की पुस्तकेही बदलतात, त्यामुळे जुनी झालेली पुस्तके पडून राहतात. या पुस्तकांचा वापर इतर विद्यार्थ्यांसाठी होऊ शकतो व त्यांचे पैसेही वाचू शकतील हा विचार करून ‘स्टार्टअप’ सुरू केले आहे. सध्या आमच्याकडे १ हजार ५०० पुस्तके असून, ही संख्या वाढत जाणार आहे, असे स्पर्श ठाकूरने सांगितले.

Video : पुणे : इंजिनिअरिंगची पुस्तके मिळणार आता भाड्याने

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे - इंजिनिअरिंगचे शुल्क भरमसाट वाढत असताना त्याचा पुस्तकांचा खर्च विद्यार्थ्यांना परवडत नाही. ही अडचण लक्षात घेऊन दोन मित्रांनी थेट ‘बुक ऑन रेंट’ हा स्टार्टअप सुरू केला. एका महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत पुस्तक अभ्यासासाठी भाड्याने घेऊन वापरता येणार आहे, त्यासाठी martolex.com हे संकेतस्थळही सुरू केले आहे. 

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) सुरू झालेल्या ‘पुणे स्टार्टअप फेस्ट २०२०’मध्ये शनिवारी या स्टार्टअपचे उद्‌घाटन झाले. ‘सीओईपी’मध्ये शिकणारा स्पर्श ठाकूर आणि ‘व्हीआयटी’मधील आयुष जैन या दोन मित्रांनी हा स्टार्टअप सुरू केला आहे. दोघेही सध्या अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अभियांत्रिकीचा अभ्यास करताना प्रत्येक सत्रामध्ये वेगवेगळी पुस्तके आवश्‍यक असतात. त्यांच्या किमती ५०० रुपयांपासून १ हजाराच्या पुढे असतात. अशा वेळी विद्यार्थी सर्वच पुस्तके विकत घेऊ शकतात असे नाही. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तक असले तरी ते मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागते. तसेच ११वी, १२वीला ‘जेईई मेन्स’, ‘जेईई ॲडव्हान्स’ याच्या तयारीसाठीही पुस्तके आवश्‍यक असतात, तीही विकत घ्यावी लागतात. त्यामुळे स्पर्श आणि आयुष यांनी martolex.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे.

मुंबई-पुणे मार्गावर धावणार पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस

संकेतस्थळावर पुस्तक शोधणे, त्याची ऑर्डर करणे, ऑनलाइन शुल्क भरणे, एखादे पुस्तक उपलब्ध नसल्यास त्याची मागणी केल्यास तेही उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी एक, तीन, सहा, नऊ महिने, एक वर्ष अशा कालावधीसाठी पुस्तक भाड्याने घेता येईल. अभ्यास झाल्यानंतर हे पुस्तक परत जमा करावे लागेल. पुस्तक भाड्याने घेताना पुस्तकाची संपूर्ण रक्कम भरावी लागेल. परत करताना भाडे कापून घेऊन उरलेली रक्कम परत विद्यार्थांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे, असे जैन याने ‘सकाळ’ला सांगितले.

loading image