मुंबई-पुणे मार्गावर धावणार पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पुणे : मुंबई व पुण्यादरम्यान धावणाऱ्या पहिल्या खासगी इलेक्ट्रिक लग्झरी बसचे केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईत उद्घाटन करण्यात आले. ही भारतातील पहिलीच इलेक्ट्रिक इंटरसिटी बस ठरली आहे. 

पुणे : मुंबई व पुण्यादरम्यान धावणाऱ्या पहिल्या खासगी इलेक्ट्रिक लग्झरी बसचे केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईत उद्घाटन करण्यात आले. ही भारतातील पहिलीच इलेक्ट्रिक इंटरसिटी बस ठरली आहे. 

डीएसके यांच्या सहा वाहनांचा लिलाव; 'या' वाहनाला मिळाली सर्वाधिक किंमत

ही देशातील पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस १२ मीटर लांब व २ बाय २ लग्झरी कोच असलेली आहे. दररोज मुंबई-पुणे मार्गावर ही बस दोन वेळा धावणार आहे.  या बससाठी पुणे आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी चार्जिंग स्थानक उभारण्यात आले असून एकदा २ तास पूर्ण चार्जिंग केल्यानंतर ही बस ३०० किमी. धावू शकते. तसेच या बसचा वेग १०० किमी. प्रती तासपर्यंत नेता येतो. बसमध्ये ४३ आरामदायी सीट्स आहेत शिवाय सामान ठेवण्यासाठी प्रशस्त जागा, यूएसबी चार्जिंगची सोय देखील आहे.

पुणे शहरात स्वाइन फ्लूचे नऊ रुग्ण

गेल्या ४ ते ५ वर्षांपासून देशात जैव इंधनावरील तसेच इलेक्ट्रिक बस मोठ्या संख्येने धावतील यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ''देशात ७ लाख कोटी रुपयांची इंधन आयात केली जाते. त्याबरोबर एक प्रकारे प्रदूषण वाढीला चालनाच मिळते. त्यामुळे सरकारने इथेनॉल, मिथेनॉल, बायो डिझेल, बायो सीएनजी आणि इलेक्ट्रिक तसेच येत्या काळात हायड्रोजन इंधनास प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या इलेक्ट्रिक बसची किंमत जास्त असली तरी पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक चार्जिंगचा येणारा खर्च पाहिल्यास ही बस भविष्यात फायदेशीर ठरेल. आगामी काळात देशात ई-महामार्ग तयार करण्याचाही आमचा विचार आहे.''

पुणे महापालिकेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूष करण्यासाठी काय घेतला निर्णय

या वेळी प्रसन्न पर्पलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न पटवर्धन, मित्रःहा मोबिलिटीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अंकित सिंघवी व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रसन्न पटवर्धन म्हणाले, ''पुणे ते मुंबई या साधारणतः १५० किमीच्या अंतरादरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळासह खासगी बस चालकांच्या अशा सुमारे २०० बसगाड्या दररोज धावतात. हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे त्यावर धावणाऱया गाड्यांची संख्या भविष्यातही वाढतच जाणार आहे. त्याबरोबरच या सर्व बसच्या माध्यमातून होणारे कार्बन उत्सर्जनही वाढणार आहे. तेल इंधनावरील अवलंबित्त्व कमी करायचे असेल तर इलेक्ट्रिक बसना पर्याय नाही. प्रसन्न पर्पलतर्फे पहिली इंटरसिटी इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा घेतलेला निर्णय त्यामुळेच महत्त्वाचा ठरतो."

पुणे विद्यापीठाच्या ‘आंतरराष्ट्रीय’तेला धक्का

भारतातील एकूण डिझेल विक्रीपैकी वाहतुक क्षेत्राकडून जवळपास ७० टक्के डिझेल वापरले जाते. त्यात बसगाड्यांसाठी ९.५५ टक्के डिझेलचा वापर होतो. संपूर्ण देशात २०३० पर्यंत पूर्णतः इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू होणे अपेक्षित आहे. त्यात इलेक्ट्रिक बसगाड्यांचा अधिकाधिक वापर सुरू होणे ही महत्त्वाची बाब ठरणार आहे. येत्या २०२२ पर्यंत इंधन आयात १० टक्क्यांनी कमी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष्य असून त्यास पाठिंबा असल्याचे  पटवर्धन यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first electric intercity bus to run on Mumbai Pune highway