इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनो, प्रॅक्टिकलचं टेन्शन सोडा; वाचा सविस्तर!

Students_Engineering
Students_Engineering

पुणे : ऑनलाईन शिक्षण सुरू झाले, पण अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आता 'आयआयटी' मुंबईच्या मदतीने अनेक महाविद्यालयांसाठी 'व्हर्च्युवल लॅब' उपलब्ध होणार आहेत. किमान ६० ते ७० टक्के प्रॅक्टिकल व्हर्च्युअल लॅबच्या मदतीने करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. 

'कोरोना' च्या महामारीतून समस्यांवर मार्ग काढून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी महाविद्यालयांचा प्रयत्न सुरू आहे. पण विज्ञान शाखेत वर्गातील शिकविण्यासह प्रयोगशाळेतील प्रयोगांना तेवढेच महत्त्व असताना महाविद्यालय बंद असताना प्रॅक्टीकल कसे करायचे हा प्रश्न आहे.
'आयआयटी' मुंबईने 'व्हर्च्युअल लॅब'चे माॅडेल विकसित केले आहे. त्याचे प्रादेशिक नोडल केंद्र म्हणून पीव्हीजी अभियाांत्रिकी महाविद्यालयाला मान्यता दिली आहे. 

या संस्थांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांसह कोल्हापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांना 'व्हर्च्युअल लॅब' कशा वापराव्यात, स्वतःच्या लॅपटॉप, डेस्कटॉप तसेच मोबाईलवरून सुद्धा वेगवेगळे प्रयोग कसे करावेत याचे प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षण वर्गात २ हजार प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे जेव्हा ऑनलाईन शिक्षण सुरू होईल, त्यावेळी 'व्हर्च्युअल लॅब'ची अभियांत्रिकी महाविद्यालयांना मोलाची मदत होईल, असे नोडल केंद्र असलेल्या 'एआयएसएसएमएस' अभियाांत्रिकी महाविद्यालयाचे व प्राचार्य डॉ. दत्तात्रेय बोरमने यांनी सांगितले.

प्रयोगशाळेचाच येतो अनुभव
आयआयटी मुंबईने विकसीत केलेल्या माॅडलमध्ये काॅम्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, सिव्हिल, बायोटेक्नॉलॉजी यासह इतर शाखांच्या प्रयोगशाळांचा समावेश आहे. विद्यार्थी ज्या प्रमाणे प्रयोगशाळेत काम करतात, त्याच प्रमाणे एका बाजूला थेअरी व दुसऱ्या बाजूला प्रयोग करता येतो. स्क्रिनवर प्रश्न विचारले जातात, त्यावरून उत्तर दिल्यानंतर त्यानुसार क्रिया होते, मग ती बरोबर आहे ती चूक हे तेथे त्वरित लक्षात येते, असे बोरमने यांनी सांगितले. 

"पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्वच विज्ञान शाखेच्या सर्वच अभ्यासक्रमासाठी व्हर्च्युअल लॅब आवश्यक आहेत. त्यासाठी प्रयत्न केले जातील. व्हर्च्युअल लॅबमुळे  विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळत असून, स्वतंत्रपणे प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रयोग करता येतील. आयआयटी मुंबईच्या या लॅबमुळे अभियांत्रिकी शिक्षणातील मोठी अडचण दूर झाली आहे."
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग पुणे विद्यापीठ

प्रादेशिक नोडल सेंटर- १  : त्याअंतर्गत येणारे नोडल केंद्र (महाविद्यालय) 
पुणे - १४
नगर - १ 
नाशिक - ३

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com