नैसर्गिक संपदा अधिकाधिक समृध्द करा : राहुल कलाटे

मिलिंद संधान.
रविवार, 29 जुलै 2018

नवी सांगवी (पुणे) : " हरित क्रांती म्हणजे केवळ शेतीतून अन्नधान्य पिकविने असे नव्हे; तर सेंद्रीय खतांचा वापर करून आरोग्यवर्धक भाजीपाला लोकांपर्यंत पोहचवित असताना येणाऱ्या काळाची गरज पाहुन नैसर्गिक संपदा अधिकाधिक समृध्द करणे होय. " असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी वाकड येथे केले. पिंपरी चिंचवड सहकारी गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनच्या वतीने वाकड परिसरात एक हजार वृक्षांचे रोपन करण्यात येत असताना आज ( ता. 29 ) रोजी त्याचा शुभारंभ रोहन तरंग सोसायटीतून करण्यात आला. त्यावेळी उपस्थित नागरिकांना उद्देशून त्यांनी आपले विचार मांडले.

नवी सांगवी (पुणे) : " हरित क्रांती म्हणजे केवळ शेतीतून अन्नधान्य पिकविने असे नव्हे; तर सेंद्रीय खतांचा वापर करून आरोग्यवर्धक भाजीपाला लोकांपर्यंत पोहचवित असताना येणाऱ्या काळाची गरज पाहुन नैसर्गिक संपदा अधिकाधिक समृध्द करणे होय. " असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी वाकड येथे केले. पिंपरी चिंचवड सहकारी गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनच्या वतीने वाकड परिसरात एक हजार वृक्षांचे रोपन करण्यात येत असताना आज ( ता. 29 ) रोजी त्याचा शुभारंभ रोहन तरंग सोसायटीतून करण्यात आला. त्यावेळी उपस्थित नागरिकांना उद्देशून त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर सहायक आयुक्त दिलिप गावडे, नगरसेवक मयुर कलाटे, संदिप कस्पटे, सुदेश राजे, डॉ द्वारकानाथ खर्डे, डॉ किरण मुळे उपस्थित होते. 

फेडरेशनच्यावतीने वृक्षारोपन, आरोग्य शिबिर आणि सेंद्रीय खतांपासून उत्पादित केलेल्या फळे व भाजीपाला या फिरत्या गाडीचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्य शिबिरात डॉ मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभरहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात रक्तातील साखर, एचआयव्ही यासारख्या चाचण्या मोफत करण्यात आल्या. महापालिका आयुक्त गावडे यांनी मतदार नोंदणीकरीता यावेळी मार्गदर्शन केले.

शिवसेना गटनेते कलाटे म्हणाले, " स्वातंत्र्यानंतर आजअखेर लोकसंख्या चारपटीने वाढली परिणामी सर्वबाजंनी ताण वाढत असताना नैसर्गिक स्त्रोतही कमी पडु लागले. त्यामुळे स्वतःपासून, स्वतःच्या कुटुंबापासून आपण सुरूवात करीत असताना घरातील कचरा आपल्या सोसायटीतच कसा जिरेल हे पाहिल्यास पर्यावरण संवर्धनाला आपलाही हातभार लागेल. "

"आंम्ही शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांनी कंपोस्ट अथवा शेणखत वापरून पिकविलेला भाजीपाला खरेदी करतो व तो सोसायट्यांच्या दारात नेऊन विकतो. यामुळे शेतकऱ्याला हमी भावापेक्षा चांगले मुल्य तर गिऱ्हाईकांना व्यापाऱ्यापेक्षा दोन पैसे कमी द्यावे लागत असल्याने आंम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे."
- डॉ द्वारकानाथ खर्डे

Web Title: Enrich Natural Resources siad Rahul Kalate