'द शो मस्ट गो ऑन' : तब्बल ७५ दिवस फेसबुक लाइव्हद्वारे..

rajabhau tikhe.jpg
rajabhau tikhe.jpg

घोरपडी (पुणे) : कोणत्याही कठीण प्रसंगामुळे डगमगून न जाता, 'द शो मस्ट गो ऑन' असं म्हणत कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करणं थांबवत नाही. त्याप्रमाणे राजाभाऊ तिखे यांनी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून रोज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून गेली 75 दिवस विविध गाण्यांचा कार्यक्रम सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन सुरू ठेवले आहे. कोरोनामुळे सर्व देशातील व्यवहार बंद झाले होते. याचा फटका मनोरंजन क्षेत्राला ही मोठ्या प्रमाणावर झाला. चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण थांबले. सिनेमागृह आणि नाट्यगृहं बंद झाले. लॉकडाऊन सुरू झाल्यावर मनोरंजन थांबणार का? असा प्रश्न पडला असताना, काही कलाकारांनी डिजिटल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजनाचे नवनवीन कार्यक्रम सुरू केले, त्या कलाकारांना व या कार्यक्रमांना चांगला प्रतिसादही  मिळाला. 


त्याप्रमाणे राजाभाऊ तिखे यांनी ऑनलाइन कार्यक्रम सुरू केला आहे. राजाभाऊ आणि त्यांचे सहकारी विविध गायनाचे कार्यक्रम करतात. महिला दिनानिमित्त मार्च महिन्याच्या अखेरीस त्यांचा वानवडी मधील हॉलमध्ये मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु राज्य सरकारने सर्व कार्यक्रमांना बंदी घातली, त्यामुळे त्यांना तो कार्यक्रम सादर करता आला नाही. सर्व तिकीट विक्री आणि अनेक नागरिकांना यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावर काहीतरी उपाय काढावा असा विचार सुरू असताना ऑनलाइन कार्यक्रम करावा असा पर्याय समोर आला. या संकल्पनेतून फेसबुकच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करण्याचे ठरवले. त्यादिवसापासून रोज संध्याकाळी तिखे गीतकार, संगीतकार, विविध अभिनेते व त्यांचा परिवार आणि विविध विषयांवर आतापर्यंत कार्यक्रम सादर केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामध्ये राजेश खन्ना, राज कपूर, दिलीप कुमार, मनोज कुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, शशी कपूर, देवानंद असे जुन्या पिढीतील सर्व अभिनेते यांचे गाणे सुरुवातीच्या काळात सादर केले. तसेच मदनमोहन, गुलजार, साहिल लुधीयानवी सह रोशन इतर संगीतकार व गीतकार यांचे गाणे गात लोकांचे मनोरंजन केले आहे. सोबत याकाळात ऋषी कपूर यांचे निधन झाल्यावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्यावर आधारित गाण्याचा कार्यक्रम केला. सध्या जीवनातील विविध भाव भावना यावर आधारित कार्यक्रम घेत आहेत. अनेकांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. रोज संध्याकाळी सहा वाजता लोक फेसबुक लाइव्हद्वारे होणाऱ्या कार्यक्रमाची वाट पाहत असतात. 
 

मला गाण्याची आवड असून विविध कार्यक्रम केले आहेत. लॉकडाउनमुळे आमचा कार्यक्रम रद्द झाला. तेव्हा फेसबुक लाइव्हद्वारे लोकांचे मनोरंजन करण्याचे ठरवले होते. पहिल्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद पाहून पुढे कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउन वाढत गेले तसेच हा कार्यक्रम सुरू ठेवला. सध्या ७५ भाग झाले असून लवकरच शतक पूर्ण अशी अपेक्षा आहे.

- राजाभाऊ तिखे, गायक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com