भाजपमध्ये उत्साह तर महाविकास आघाडीमध्ये निराशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi and BJP

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे भाजपला पुन्हा एकदा राज्यात सत्ता स्थापन करण्याची संधी मिळेल.

भाजपमध्ये उत्साह तर महाविकास आघाडीमध्ये निराशा

पुणे - महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे भाजपला पुन्हा एकदा राज्यात सत्ता स्थापन करण्याची संधी मिळेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या शक्यतेने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सरकार कोसळल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये निराशा निर्माण झालेली आहे. पण आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मी जोरदार टक्कर देऊ. सत्ता येते जाते आम्हाला काही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. २९) रात्री राजीनामा दिला त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्याची परिणाम पुण्यातील राजकारणावर झाला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने राज्यात भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी संधी मिळणार असल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच महापालिका निवडणुकीसाठी देखील याचा फायदा होणार असल्याने पालिकेतील पुन्हा एकदा सत्ता मिळू असा विश्वास पदाधिकारी व्यक्त करत आहेत. पण हे सरकार कोसळल्यानंतर भाजपने सावध भूमिका घेत, राज्यात स्थापन होऊन फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच जल्लोष साजरा केला जाणार आहे.

शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षात सत्ता गेल्याने नाराजी निर्माण झालेली आहे. भाजपने सर्व प्रकारच्या यंत्रणा वापरून सरकारमधील मंत्र्यांना नामोहरण करून आमदारांमध्ये फूट पाडून एका सुसंस्कृत मुख्यमंत्र्याला राजीनामा देण्याची वेळ आणली अशी टीका केली.

'महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षापासून भ्रष्टाचारी, गुंडागिरी करणारे तीन पक्षांचे सरकार होते. या सरकारला जनहिताची कामे करता आली नाहीत, हे सरकार पडल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर जाणार आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने राज्याला सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व मिळेल. पुणे शहराला याचा फायदा होईल महापालिकेवर भाजप पुन्हा एकदा सत्ता काबीज करेल.'

- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन काम केले. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली असली तरी सर्वसामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. सत्ता असली काय किंवा नसली काय आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही जनतेची कामे करण्यात कायम तत्पर आहोत.'

- गजानन थरकुडे, शहर प्रमुख, शिवसेना

'भाजपने शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडले आहे. लोकशाहीचे आणखी किती लचके तोडणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. एक सुसंस्कृत मुख्यमंत्री या निमित्ताने जनतेला पाहायला मिळाला. भविष्यातील स्थिती पाहून काँग्रेस पक्षाची धोरणे निश्चित केले जातील.'

- अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस

'२०१४ ते २०१९ या पाच वर्षातील आक्रस्ताळे नेतृत्व आणि गेल्या अडीच वर्षातील सुसंस्कृत शांत नेतृत्व हा फरक महाराष्ट्राने अनुभवला. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. हे सरकार पडले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकहिताची कामे कायम सुरू असतील. महापालिका निवडणुकीत भाजपला धूळ चारल्याशिवाय राष्ट्रवादी शांत बसणार नाही.'

- प्रदीप देशमुख, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Enthusiasm In Bjp And Disappointment In Mahavikas Aghadi Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top