Sakal : सकाळ ई-लेखन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal

Sakal : सकाळ ई-लेखन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

पुणे : ‘सकाळ माध्यम समूहाने’ आयोजित केलेल्या ई-लेखन स्पर्धेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लेखन कौशल्य असलेल्या युवकांना १६ नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आहे.

सकाळ ई-लेखन स्पर्धेमध्ये यशस्वी होणाऱ्या निवडक युवक-युवतींना ए. पी. ग्लोबाले आणि ‘सकाळ समूहा’तील कंपन्यांतही इंटर्नशीपचीही संधी मिळणार आहे.

विविध प्रकारच्या जाहिरातीसाठीचे लेखन (कॉपी रायटिंग- ५० ते १०० शब्द), समाजमाध्यमांवरील लेखन (कंटेट फॉर सोशल मीडिया, पोस्ट - हॅशटॅग आणि कमाल ५० शब्द), शोधनिबंध (आकडेवारी, कोट आदींसह सुमारे २००० शब्द) असे कौशल्य या स्पर्धेच्या माध्यमातून युवा लेखकांना दाखवण्याची पुरेपूर संधी मिळणार आहे.

या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या तसेच गुणवंत युवकांना सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ वृत्तपत्र, फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीज, साम टिव्ही, ई-सकाळ, ‘एपी ग्लोबल समूह’ आदी विविध कंपन्यांत बातम्या, ऑनलाईन न्यूज, नागरिक-प्रशासन संवाद, ॲंकर-न्यूज रिडर आदी ठिकाणी इंटर्नशीप करण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धकांना ‘सकाळ डिजिटल लेखन फेस्ट’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. या फेस्टमध्ये पत्रकारिता व लेखन क्षेत्रातील दिग्गज मान्यवर स्पर्धकांना मार्गदर्शन करणार असून त्यांच्याशी संवादही साधता येईल. या फेस्टमधून तीन विजेते निवडले जाणार असून त्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातील. सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र मिळणार आहे. स्पर्धकांच्या लेखनाचे परीक्षण सकाळचे संपादक सम्राट फडणीस, फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीचे ‘सीईओ’ अंकित भार्गव, साम टिव्हीचे संपादक प्रसन्न जोशी करणार आहेत. स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी सोबत दिलेला क्युआर कोड स्कॅन करा.

टॅग्स :Pune NewspuneSakal